Ad will apear here
Next
‘डेअरडेविल्स’च्या खेळाडूंचा ‘डीटीडीसी’च्या ग्राहकांशी संवाद
‘डीटीडीसी’तर्फे आयोजित कार्यक्रमात ग्राहकांशी संवाद साधताना दिल्ली डेअरडेविल्सचे खेळाडू.

मुंबई : ‘डीटीडीसी’ या भारताच्या आघाडीच्या एक्स्प्रेस पार्सल सेवा प्रदाता कंपनी आणि दिल्ली डेअरडेविल्सच्या अधिकृत लॉजिस्टिक्स भागीदाराने फ्रँचायझीमधील काही प्रमुख खेळाडूंसोबतच त्यांच्या ग्राहकांसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमामध्ये ‘डीटीडीसी’चे ब्रॅंड अॅम्बेसेडर व दिग्गज सौरव गांगुली यांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली.

प्रख्यात क्रीडा पत्रकार व लेखक बोरिया मजुमदार यांनी कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली. या कार्यक्रमाला टीममधील गौतम गंभीर, ग्लेन मॅक्सवेल, पृथ्वी शॉ, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, संदीप लमिछाने हे प्रमुख खेळाडू उपस्थित होते. खेळाडूंनी क्रिकेटजगतातील त्यांच्या प्रवासाबाबत चर्चा केली आणि भव्य यश मिळालेले असताना देखील विनम्र राहण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले.

याप्रसंगी ‘डीटीडीसी’चे कार्यकारी संचालक अभिषेक चक्रवर्ती म्हणाले, ‘कस्टमर इव्हेंट सत्राने आमच्या ग्राहकांना त्यांच्या आवडत्या क्रिकेटरसोबत चर्चा करण्याची संधी दिली. आमचे ब्रॅंड अॅम्बेसेडर सौरव गांगुली यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली. कार्यक्रमामध्ये अशा दिग्गज व्यक्तींची उपस्थिती पाहून ग्राहक खूपच आनंदित झाले. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल ‘डीटीडीसी’ची संपूर्ण टीम डीडी संघाचे खेळाडू व सौरव गांगुलीचे आभार मानते. आम्ही संघाला त्यांच्या आगामी सामन्यांसाठी मन:पूर्वक शुभेच्छा देतो आणि आशा करतो की ते आपल्या क्षमतेनुसार सर्वोत्तम खेळ सादर करतील.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZNXBO
Similar Posts
‘डीटीडीसी’ दिल्ली डेअरडेविल्स संघाचा लॉजिस्टिक्स भागीदार मुंबई : ‘इंडियन प्रिमिअर लीग’ अर्थात ‘आयपीएल २०१८’ पर्वासाठी दिल्ली डेअरडेविल्स‍ (डीडी) संघाचा अधिकृत लॉजिस्टिक्स भागीदार म्हणून डीटीडीसीची नियुक्ती करण्यात आली आहे.
‘ब्रेक दी बिअर्ड’साठी ‘सनरायझर्स’ सज्ज मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) या सीझनमध्ये मैदानात आणि मैदानाबाहेरही सतत गेममध्ये बदल होत आहेत. अशातच क्रिकेटपटू ‘#BreakTheBeard’ला एका नवीन पातळीवर नेण्यासाठी तयार झाले आहेत.
‘आयएफएसजी’तर्फे ‘स्टार्स ऑफ टुमॉरो’ उपक्रमाची घोषणा मुंबई : दी इंडियन फेडरेशन ऑफ स्पोर्टस् गेमिंगतर्फे (आयएफएसजी) खेळाडूंना पाठबळ देणाऱ्या ‘स्टार्स ऑफ टुमॉरो’ (एसओटी) या उपक्रमाची घोषणा करण्यात आली. सेलिंग, स्क्वॅश, टेनिस, जलतरण आणि गोल्फ यांसारख्या मुख्य प्रवाहात नसलेल्या खेळांमधील देशातील उत्कृष्ट भावी खेळाडू हेरून त्यांना पाठबळ देण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे
‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा मुंबई : कोलगेट पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेडतर्फे वार्षिक कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, या अंतर्गत ५०० हून जास्त मुलांना एक लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल; तसेच ‘बायजू’चे शैक्षणिक अॅप घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला ऑफर पॅकवर एका महिन्याचे सब्‍सक्रीप्‍शन मोफत मिळेल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language